मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-Magel Tyala Saur Krushi Pump , Apply Online, Status Check, Payment
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी योजना आणत असतं यामध्ये राज्य सरकारने Magel Tyala Saur Krushi Pump. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येण्यासाठी राज्य सरकार अर्ज मागवत आहे आपण या योजनेची डिटेल्स मध्ये माहिती खाली बघणार आहोत.
Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाण्याचा भरपूर साठा आहे व विश्वसनीय स्रोत आहे परंतु सिंचनासाठी वीज नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजना आणलेली आहे व शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बांधावर सोलर बसवला जाईल मोटर द्वारे शेतीला पाणी दिले यामध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकार दिवसा वीज पुरवण्याचा आग्रही मागणी पूर्ण करत आहे यातून शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी पाणी देता येईल
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये
– शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज देण्याचा स्वयंपूर्ण योजना
– शेतकऱ्यांना सौर पॅनल चा संपूर्ण संच मोटार सहित फक्त दहा टक्क्यांमध्ये बसून दिला जाईल
– S/T या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागेल
– उर्वरित खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरणार आहे
– विज बिल किंवा वीज का पतीची शेतकऱ्यांना आता काळजी राहणार नाही
– शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारमानानुसार 3 ते 7.5 HP पर्यंत चे पंप दिले जातील
– सोलर पंप सेटअप पाच वर्षाची दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे
– सिंचन वापरासाठी दिवसा वीज हमी दिली जात आहे
लाभार्थ्यांची निवडीचे निकष
– 2.5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन हॉर्स पावर एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप मिळतील
– 2.51 ते 5 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपी पंप मिळणार आहेत
– पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात एचपी पंप मिळणार आहेत ( शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेल्या पंप देखील निवडू शकता असा पर्याय दिलेला आहे)
– वैयक्तिक किंवा सामुदायिक बोरवेल विहिरी शेततळे आणि नद्या किंवा नाल्या जवळील मालकांना या योजनेसाठी अर्ज करू शकतात
– बोरवेल विहीर किंवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा मुबलक किंवा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे
– ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सौर पंप योजनेचा लाभ घेतला नाही जसे की अटल सौर पंप योजना एक आणि दोन मुख्यमंत्री सौर पंप योजना ते अजूनही योजनेसाठी अर्ज करू शकतात
आवश्यक कागदपत्रे
– शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा (जलस्रोताची नोंद आवश्यक आहे) अर्जदार स्वतःच्या जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्स्यदारांचा मालकांचा न हरकत दाखला दोनशे रुपये स्टॅम्प पेपर देणे बंद करत राहील
– आधार कार्ड
– बँक पासबुक
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– जातीचे प्रमाणपत्र व अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी
– पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
– मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत Solar MTSKPY पोर्टल जा त्यानंतर लाभार्थी सुविधा या टॅब वर क्लिक करा आणि अर्ज करा या बटणावर क्लिक करा
– या अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती तसेच रहिवाशी पत्ता जलस्रोत सिंचन माहिती कृषी तपशील अगोदर असलेल्या पंपाचा तपशील व लागणाऱ्या पंपाचा तपशील बँक माहिती घोषणापत्र आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा
– अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक पोच पावती मिळेल आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता आणि रक्कमही भरू शकता
हेल्पलाइन नंबर
राज्य सरकारने सौर कृषी पंप योजनेसाठी ज्यांनी अर्ज केला आहे अर्ज करताना काही अडचण आली त्यांनी तालुक्यात स्तरीय वरील महावितरण उपविभागीय कार्यालय संपर्क साधावा तसेच महावितरण केंद्रीय ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता मदतीसाठी शेतकऱ्यांनी 1800 233 34 35 किंवा 1800 212 34 35 या टोल फ्री नंबर वर कॉल करू शकता