Pm Kusum Solar Yojana In Marathi 2024 – 25 पीएम कुसुम सोलर योजना
Pm Kusum Solar Yojana In Marathi 2024 -25 भारत सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले योजना आणत असतं त्यामध्ये सर्वात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे पीएम किसान सोलर योजना यामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप दिला जातो त्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा लाईट मोटरचा वापर करता येईल या योजनेबद्दल आपण सर्व माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक, कागदपत्रे, प्रमुख मुद्दे, मिळणारे फायदे आणि बरच काही.
Pm Kusum Solar Yojana :
आपला भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे योजनांचा फायदा होईल याचा विचार कायम सरकार करत असतो याच धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी योजना लागू केली आहे यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार विविध घटकातील आर्थिक परिस्थिती असणाऱ्यांना व अनेक घटकांसाठी विशेष योजना राबवत असते. जेणेकरून समाजातील आर्थिक व दुर्बल घटकातील समाजासाठी त्याचा लाभ व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदती त फायदा व्हावा व शेतकरी स्वावलंबी बनणे हाच केंद्र व राज्य सरकारचा त्यामागचा उद्देश व हेतू असतो.
आपले भारत सरकार अनेक घटकांसाठी विविध योजना तयार करत असते जेणेकरून त्याचा फायदा दुर्बल व आर्थिक मागासलेल्या वर्गातील लोकांना त्याचा फायदा व्हावा व ती शेतकरी व तो घटक स्वलंबी व्हावा तसेच अनेक प्रकारचे केंद्र सरकार योजना आणत असतो. त्यामध्ये महिलांसाठी विधवा पेन्शन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. व शेतकऱ्यांसाठी पीएम किसन योजनेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांची शेती योग्यरीत्या दिवसा लाईटवर पाणी देता यावा शेतीसाठी हा त्यामागचा हेतू होता तसेच आर्थिक व दुर्बल शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती योग्यरीत्या चालवण्याकरता वर्षासाठी तीन महिन्याच्या अंतरावरती आर्थिक मदत पैशांमध्ये मदत केली जाते त्यासाठी केंद्र सरकार सहा हजार रुपये व महाराष्ट्र सरकार सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार योजना अंतर्गत अनेक घटकातील अनेक विविध घटकातील लोकांना कुटुंबांना या योजनेचा आर्थिक लाभ झालेला आहे. केंद्र सरकारचा या योजने मागचा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या देशातील मी व आपल्या राज्यातील लोकांना त्यांच्या गरज आहे अशा लोकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्यांना कुसुम योजनेमध्ये सोलर मिळालेला नाही किंवा त्यांचा फॉर्म पास झालेला नाही अशांसाठी मागील त्याला सोलर ही योजना नवीन चालू केली आहे ही योजना आर्थिक व दुर्बल शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे.
Pm Kusum Solar Yojana कुसुम सोलर पंप योजना माहिती:1
भारत सरकारकडून भारतातील शेतकऱ्यांसाठी मदत प्रसन्न देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न मध्ये अधिक वाढ होण्यासाठी भारत सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये अधिक अधिक वाढ होण्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचे पावले उचलत असते . व शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आर्थिक मदतही केली जाते अशाच प्रकारचा उद्देश लक्षात घेऊन पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी काम व शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य तो वेळे पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करणे हे महत्त्वाचे हेतू आहे पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप बसवणे साठी भारत सरकारकडून 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते तसेच एसटी एससी अंतर्गत प्रवर्गातील लोकांसाठी फक्त पाच टक्के रक्कम भरून 95 टक्के भारत सरकार भरत असते या या मागचा उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रगती व शेतीतील उत्तम वाढावे व त्यांना आर्थिक सामना करावा लागू नये व त्यांना योग्य वेळी वीज मिळावी ही या योजनेचा महत्वाचा उद्देश लक्षात ठेवून केंद्र सरकारने पीएम किसान योजना चालू केली आहे.
Pm Kusum Solar Yojana कुसुम सोलर योजना:
पीएम कुसुम सोलर योजना ही केंद्र सरकारने भारतातील सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप वाचवायचा आहे त्यासाठी अर्ज मागत आहे. महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेणारी इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने मागील त्याला सोलर ही एक पण योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप सारा फायदा होऊ शकतो व सोलर पंपाचे कोटा वाढवून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल याद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध होईल हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
या लेखाद्वारे सर्व शेतकऱ्यांसाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने मागील त्याला सोलर ही एक पण योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप सारा फायदा होऊ शकतो व सोलर पंपाचे कोटा वाढवून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल याद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध होईल हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
या लेखाद्वारे सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज तसेच योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख पात्रता कागदपत्रे उद्दिष्ट इत्यादी माहिती तुम्हाला लेखाद्वारे दिली जात आहे या लेखाचा एकमेव उद्देश असा आहे की ज्या लोकांना व शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही किंवा कोणत्या प्रकारची प्रोसेस माहित नाही या लेखातून संपूर्ण माहिती दिल्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचवा जेणेकरून तुम्हाला कुसुम सोलर पॅनल ची संपूर्ण माहिती तसेच मागील त्याला सोलर योजनेची माहिती तुम्हाला मिळून जाईल.
Pm Kusum Solar Yojana कुसुम सोलर योजना सारांश व मुद्दे:
या योजनेचे नाव : कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्यासाठी अंतर्गत महाराष्ट्र राज्य.
लाभार्थी: शेतकरी
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन आणि ऑफलाइन
वर्ष : २०२४/२०२५/२०२६
योजनेचा उद्देश : शेतकऱ्यांना सरकारी अनुदानावर सौर पॅनल उपलब्ध करून देणे
सोलर पॅनल क्षमता: ३ hp ते ७.५ hp
Pm Kusum Solar Yojana/ Magel Tyala Saur Yojana Maharashtra:
ही केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार या योजना राबवत आहे या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे केंद्र सरकारची पीएम कुसुम सोलर योजना यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक कोटा व एक ठराविक संख्येमध्ये सौर पॅनलचे कोटा होता यामध्ये अनेक शेतकरी राहत असत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ज्यांना पीएम कुसुम सोलर योजना किंवा अटल सौर योजना यामध्ये शेतकऱ्यांना सौर पॅनल भेटला नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना राबवली आहे यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व प्रोसेस पीएम कुसुम योजनेसारखीच असेल फक्त नवीन पोर्टल ओपन करून महाराष्ट्र सरकारने नवीन कोठा व अतिरिक्त सौर पॅनल उपलब्ध करून दिले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे व लवकरात लवकर सोलर पॅनल दिले जाण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा पाऊल उचलले आहे.
या योजनेचा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान श्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आव्हान केले आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्यांना थोड्या दिवसानंतर सक्सेसफुली ऑनलाइन फॉर्म भरला आहे असा मेसेज येतो त्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्विस म्हणजे तुमच्या शेतीमध्ये ज्या ठिकाणी मुख्य स्रोत आहे पाण्याचा त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फी व त्या ठिकाणचा लाईव्ह सर्वे करून तो मेढा किंवा महाऊर्जा या याद्वारे करण्यात येतो त्याद्वारे तुमच्या शेतीचे लोकेशन व सातबाराचे सर्व माहिती व शेतकऱ्याची सेल्फी काढून सिंचनाचा स्रोत ही सर्व माहिती त्या ॲपद्वारे भरून घेतली जाते त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येतो त्यामध्ये आपल्याला ऑनलाइन पेमेंट करावा लागतो आपण ऑनलाइन पेमेंट यूपीआय किंवा बँकेच्या क्रेडिट कार्ड सेविंग कार्ड डेबिट कार्ड द्वारे करू शकतो ते पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचे सोलर पॅनल बसवायचे आहे तो ऑप्शन येतो तो ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ज्या चांगल्या कंपनी किंवा तुमच्या परिसरात ज्या कंपन्या त्वरित सेवा देतील अशा कंपन्या निवडून सर्वे पूर्ण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचा फोन येईल किंवा मेसेज येतो त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होती व तुमच्या शेताच्या बांधावर कंपनीचे सर्व लोक येऊन तुम्हाला सौर पॅनल बसून दिला जातो त्यानंतर तुम्हाला काही सौर ऊर्जेची माहिती दिली जाते लाईव्ह सर्व केले जाते तुम्हाला मोटर कशाप्रकारे ऑन करायची ऑफ करायची मोबाईलद्वारे बी कसे प्रकारे तुम्ही ऑनलाईन करू शकता चालू बंद ही सर्व माहिती दिली जाते तसेच तुम्हाला सौर पॅनल चालू करून मोटर द्वारे किती पाणी मारले जाते हे पण लाईव्ह दाखवले जाते ते झाल्यानंतर जर तुमचं सौर पॅनल कमी पाणी मारत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता तुमच्या तक्रारची निवारण लगेच केले जाते तुमची कसल्या प्रकारची तक्रार नसेल तर ओके म्हणून तुमचा परत एक फोटो काढला जातो सौरंसमोर आणि वेबसाईटवर अपलोड केला जातो तुमचं सौर पॅनल योग्यरीत्या बसवलेले जातो तुम्हाला त्यानंतर महाऊर्जा किंवा त्या संबंधित विभागाचे लोक येऊन सर्व पाहणी केली जाते व तुम्हाला पाच वर्षाची हमीपत्र दिले जाते त्यामध्ये इन्शुरन्स व कोणत्याही प्रकारची मोटर किंवा सौर ला प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त करून दिले जाते अशा प्रकारे तुमची सौर बसवून त्यापुढे तुम्हाला पाच वर्ष सर्व प्रकारची सोय व सेवा दिली जाते ही आजपर्यंतची राज्य सरकार व केंद्र सरकारची शेतकऱ्यांची हिताची योजना आहे पाच वर्षांमध्ये सौर पॅनल किंवा मोटार चोरी गेल्यास त्याचेही इन्शुरन्स मध्ये कव्हर असतो. सौर पॅनलचा स्टार्टर वॉटरप्रूफ असतो व त्यामध्ये काही खराबी झाल्यास तुम्हाला तो पाच वर्षाच्या आत बदलून दिला जातो.
Pm Kusum Solar Yojana पी एम कुसुम सोलर योजना:
या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पुरवठा नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे लाईटचे कनेक्शन नाही व त्या शेतकऱ्याचा विद्युत पंप नाही व त्या ठिकाणी सौर किरण येत आहे जेणेकरून 24 तासातील 12 ते 15 तास सौर पंपाचा वापर करता येईल. शेतकरी त्यातून आपल्या शेतीसाठी उपलब्ध पाणीपुरवठा दिवसा करू शकतात यामुळे त्या शेतकऱ्याच्या शेताला किंवा पिकाला कोणत्याही प्रकारची पाण्याची कमतरता भासणार नाही व त्याचा डिझेलचा खर्च वाचेल या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Pm Kusum Solar Yojana पीएम कुसुम योजना 2024-25 फायदे:
या योजनेचा मुख्य उद्देश ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज नाही तेथे या योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतात.
या योजनेमुळे भारतातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा लाईट वापरता येईल हा मुख्य उद्देश आहे व शेतीसाठी सिंचनाचा वापर योग्य होऊ शकतो.
पंतप्रधान कुसुम सोलर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी वीज निर्मिती करण्यासाठी सोलर प्लॉट दिले जाणार आहे.
याद्वारे शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलर प्रकल्प व त्याद्वारे वीज निर्मिती करून शेतीतील उत्पन्न वाढू शकतात व त्यांना आर्थिक मदत होऊ शकते.
Pm Kusum Solar Yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
Pm Kusum Solar Yojana पीएम कुसुम सोलर योजना आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
मोबाईल नंबर
दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
रहिवासी दाखला
अर्जदाराचा सातबारा
पत्त्याचा पुरावा
बँकेचा सुरुवातीचा फोटो
सामूहिक शेती असेल तर स्टॅम्प पेपर नोटरी करून देणे
Pm Kusum Solar Yojana पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया :
पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्टेप नुसार तुम्हाला पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज करता येईल.
सर्वात आधी पीएम कुसुम योजना अधिकृत वेबसाईटला विजिट करायचं आहे. वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर अर्जदाराला समोर एक होम पेज उघडेल.
या वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला पीएम कुसुम योजना अंतर्गत कुसुम सोलर योजना ह्या दिलेल्या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करावे लागेल.
त्यानंतर अर्जदाराच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये अर्जदाराला न्यू एप्लीकेशन म्हणजे मेक अ न्यू एप्लीकेशन हा पर्याय क्लिक करावा लागेल.
या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी सबमिट करावा लागेल त्यानंतर शेतकऱ्यांची थोडीफार माहिती टाकावी लागेल म्हणजे जसं नाव गाव जिल्हा तालुका राज्य हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटणावर क्लिक करायचं आहे.
यानंतर यानंतर तुम्हाला काही माहिती पुन्हा भरावी लागेल जस की तुमचं नाव आधार कार्ड ची माहिती आधार कार्ड चा नंबर एक केवायसी बँक खात्याचा संबंधित माहिती त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा अपलोड करावा लागेल जो तीन महिन्याच्या आत असेल तो घोषणापत्र जात प्रमाणपत्र ही सर्व माहिती व कागदपत्रे तुम्हाला व पंपाची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
यानंतर तुमचा पीएम कुसुम योजना अर्जदाराला सेल्फ डिक्लेअर साठी दिलेल्या चेक बॉक्स वरती क्लिक करावे लागेल त्यानंतर अर्ज पूर्ण होईल.
यानंतर अर्जदारांनी ऑनलाइन पेमेंट क्लिक करा व पैसे भरल्यानंतर अर्जदार जो क्रमांक प्राप्त होतो आणि एसएमएस द्वारे देखील अर्ज करायला त्याबद्दलची माहिती प्राप्त होते ती माहिती तुम्ही क्रमांक प्रिंट भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता तुमचं संपूर्ण अर्ज हा डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला पीएम कुसुम सोलर योजनेचा मेसेज मेसेज येतो तुमचा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे.
सावधान :
या योजनेद्वारे अनेक फ्रॉड कॉल किंवा एसएमएस तुमच्याजवळ येतील या लिंक वर क्लिक करा याद्वारे सौर कुसुम पॅनलचे पेमेंट करा असे मेसेज येतील अशा मेसेजला बळी पडू नका अधिकृत वेबसाईट ला जाऊन आपला अर्ज कुठपर्यंत आला आहे याची माहिती घेऊन ऑनलाइनच आपल्या वेबसाईट किंवा मेडा ॲप किंवा महाऊर्जा ॲप डाऊनलोड करून याद्वारे सेल्फ सर्विस करून अर्ज पूर्ण करावा. 🙏🏻